पत्रकारांकडून वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेशइंडियन जर्नलिस्ट असोसिएशन® मराठवाडातर्फे “एक झाड आईच्या नावाने” अभियानांतर्गत वृक्षारोपण

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) | प्रतिनिधी
पर्यावरण संरक्षण आणि हरित भारताचा संकल्प साकार करण्याच्या उद्देशाने इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन® मराठवाडा यांच्या वतीने भारत सरकारच्या प्रेरणादायी “एक झाड आईच्या नावाने” या अभियानांतर्गत पडेगाव, छत्रपती संभाजीनगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी मराठवाडा प्रदेश संघटन सचिव सय्यद अन्वर अली कादरी तसेच ज्येष्ठ पत्रकार सय्यद जाकीर हुसेन यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. उपस्थित पत्रकारांनीही अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमात बोलताना प्रदेश संघटन सचिव सय्यद अन्वर अली कादरी म्हणाले की, “एक झाड लावणे म्हणजे केवळ निसर्गाची सेवा नव्हे, तर भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी भक्कम पायाभरणी आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि कमी होत चाललेले जंगलाचे क्षेत्र ही गंभीर समस्या असून प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केल्यास पृथ्वी पुन्हा हिरवीगार होऊ शकते. ‘एक झाड आईच्या नावाने’ हा उपक्रम मातृसन्मानासोबतच पर्यावरणाप्रती असलेली आपली जबाबदारी अधोरेखित करतो.”
ज्येष्ठ पत्रकार सय्यद जाकीर हुसेन यांनी सांगितले की, “पर्यावरणाचे रक्षण करणे हे केवळ शासनाचे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे. वृक्ष आपल्याला प्राणवायू, पाऊस, भूजल संवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण देतात. त्यामुळे केवळ झाडे लावणे पुरेसे नाही, तर ती मोठी होईपर्यंत त्यांचे नियमित संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.”
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाढते तापमान, प्रदूषण आणि नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची गरज अधोरेखित केली. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात, शाळेत, कार्यालयात, शेतात तसेच सार्वजनिक ठिकाणी झाडे लावून पर्यावरण संवर्धनाच्या या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास सय्यद महमूद, सय्यद गफ्फार, शेख सोहेल, बब्लू शेख, दिनेश येलदी, आरिफ सय्यद, जुबेर सय्यद, अदिती आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button